Wednesday, August 29, 2012

SudarshanChakra Stotra सुदर्शनचक्र स्तोत्र

SudarshanChakra Stotra 

This SudarshanChakra Stotra is in Sanskrit. It is from Garud Purana. God Vishnu holds SudarshanChakra in his right hand’s figure. It is a very powerful weapon of God Vishnu. Here in this stotra, it is said that SudarshanChakra has many qualities, such as power to kill demons, cruel people to protect its devotees. Suchakra and Vichakra are the other names of SudarshanChakra. It has power to protect and destroy the world. Whosoever recites this very pious SudarshanChakra stotra becomes free from all his difficulties, diseases and finally reaches to Vishnu Loka.
सुदर्शनचक्र स्तोत्र 

नमः सुदर्शनायैव सहस्रादित्यवर्चसे । 
ज्वालामालाप्रदीप्ताय सहस्राराय चक्षुषे ॥ 
सर्वदुष्टविनाशाय सर्वपातकमर्दिने । 
सुचक्राय विचक्राय सर्वमन्त्रविभेदिने ॥ 
प्रसवित्रे जगद्धात्रे जगद्विध्वंसिने नमः । 
पालनार्थाय लोकानां दुष्टासुरविनाशिने ॥ 
उग्राय चैव सौम्याय चण्डाय च नमो नमः । 
नमश्र्चक्षुःस्वरुपाय संसारभयभेदिने ॥ 
मायापञ्जरभेत्रे च शिवाय च नमोनमः । 
ग्रहातिग्रहरुपाय ग्रहाणां पतये नमः ॥ 
कालाय मृत्यवे चैव भीमाय च नमोनमः ॥ 
भक्तानुग्रहदात्रे च भक्तगोप्त्रे नमो नमः । 
विष्णुरुपाय शान्ताय चायुधानां धराय च ॥ 
विष्णुशस्त्राय चक्राय नमो भूयो नमो नमः । 
इति स्तोत्रं महत्पुण्यं चक्रस्य तव कीर्तितम् ॥ 
यः पठेत् परया भक्त्या विष्णुलोकं स गच्छति । 
चक्रपूजाविधिं यश्र्च पठेद्रुद्र जितेन्द्रियः । 
स पापं भस्मसात्कृत्वा विष्णुलोकाय कल्पते ॥ 
॥ इति श्रीगरुडपुराणे सुदर्शनचक्र स्तोत्रं संपूर्णम् ॥
सुदर्शनचक्रस्तोत्र मराठी अर्थ 
सहस्र सूर्यांच्यासारखे तेज असलेल्या सुदर्शनचक्राला माझा नमस्कार असो. तेजस्वी किरणांच्या मालानी प्रदीप्त असे हजारो अरे, नेत्रांप्रमाणे असलेल्या, सर्व दुष्टांचा नाश करणार्‍या आणि सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणार्‍या सुदर्शन चक्राला माझा नमस्कार असो. सुचक्र आणि विचक्र अशी नावे असलेल्या, संपूर्ण मंत्रांचा भेद करणार्‍या, जगत सृष्टिचे पालनपोषण आणि संहार करणार्‍या हे सुदर्शनचक्रा तुला माझा नमस्कार असो. संसाराचे रक्षण करण्यासाठी आणि देवतांचे कल्याण करणार्‍या, दुष्ट राक्षसांचा विनाश करणार्‍या, उग्र आणि प्रचंड स्वरुप दुष्टांच्या संहारासाठी आणि सौम्य स्वरुप सज्जनांसाठी हे सुदर्शनचक्रा तुला वारंवार नमस्कार असो. जगतासाठी नेत्रस्वरुप होऊन संसार भयाचा नाश आणि मायारुपी पिंजर्‍याचा भेद कल्याणकारी सुदर्शनचक्राला नमस्कार असो. ग्रह तसेच अतिग्रहस्वरुप, ग्रहपति, कालस्वरुप, मृत्युस्वरुप, पापी लोकांसाठी अतिभयंकर असलेल्या सुदर्शनचक्राला नमस्कार असो. भक्तांवर कृपा करणार्‍या, त्यांच्यासाठी रक्षक असलेल्या, विष्णुस्वरुप असलेल्या, शांतस्वभावी, सर्व आयुधांची शक्ती आपल्यांत धारण करणार्‍या, हे सुदर्शनचक्रा ! हे विष्णुच्या आयुधा तुला माझा वारंवार नमस्कार असो. हे शंकरा ! सुदर्शनचक्राच्या या महापुण्यशाली स्तोत्राचा जो माणूस भक्तीभावाने पाठ करतो; तो विष्णुलोक प्राप्त करतो. अशा प्रकारे श्रीगरुड पुराणांतील हे सुदर्शनचक्र स्तोत्र पुरे झाले.
SudarshanChakra Stotra 
सुदर्शनचक्र स्तोत्र 


Custom Search

Friday, August 10, 2012

Vasudev Krut ShriKrishna Stotra वसुदेवकृत श्रीकृष्ण स्तोत्र

Vasudev Krut ShriKrishna Stotra 

We celebrate God ShriKrishna Birthday on Shravan Krushna Ashtami every year. This year we are celebrating it on Thursday, 9th August 2012. We also call the day as Janmashtami or Gokul Ashtami. Many people keep fast on this day. Then next day they eat their normal food. This is called as parane or Gopal-Kala. Vasudev and Devaki were father and mother of God Shri Krishna. In earlier Births Vasudev was Kashyap Rushi and Devaki was Aditi. God had blessed them and assured them that he would take birth in their house and they would be his father and mother. To fulfill their wish God ShriKrishna appeared in front of them in his divine form. Then Vasudev praised God Shri Krishna in the stotra created by him and asked him to take a form of child and let them enjoy all the activities of child. God Shri Krishna then took the form of a child in the lap of Devaki. Vasudev Said: O God Shri Krishna! You are everywhere, you are very big as well as very small, nobody can see you, you are Nirguna and you are Saguna and having many virtues, you are present in every form of life, you are present since ancient times, There is no start or no end for you, God Shiva who is having five mouths is unable to praise you, describe you. Skanda having six mouths is also unable to praise you. Shesha Nag could not praise you. Goddess Saraswati was also not able to praise you. Master of all Master yogis; God Ganesh also unable to describe your virtues or praise you. Creator of Vedas; God Brahma was also unable to praise you. Shruties can’t praise you with proper words. As such how can Rushies, Gods, Learned people can praise you? Finally Vasudev is asking God Shri Krishna to leave his devine form and take a form of child. The person who recites this stotra three times (Sandhya Times) in a day becomes free from all troubles in his life. Receives blessing by God Shri Krishna in the form of a son who becomes devotee of God ShriKrishna.
वसुदेवकृत श्रीकृष्ण स्तोत्र 
श्रीमन्तमिन्द्रियातीतमक्षरं निर्गुणं विभुम् । 
ध्यानासाध्यं च सर्वेषां परमात्मानमीश्र्वरम् ॥ १ ॥ 
स्वेच्छामयं सर्वरुपं स्वेच्छारुपधरं परम् । 
निर्लिप्तं परमं ब्रह्म बीजरुपं सनातनम् ॥ २ ॥ 
स्थूलात् स्थूलतरं व्याप्तमतिसूक्ष्ममदर्शनम् । 
स्थितं सर्वशरीरेषु साक्षिरूपमदृश्यकम् ॥ ३ ॥ 
शरीरवन्तं सगुणमशरीरं गुणोत्करम् । 
प्रकृतिं प्रकृतीशं च प्राकृतं प्रकृतेः परम् ॥ ४ ॥ 
सर्वेशं सर्वरूपं च सर्वान्तकरमव्ययम् । 
सर्वाधारं निराधारं निर्व्यूहं स्तौमि किं विभो ॥ ५ ॥ 
अनन्तः स्तवनेsशक्तोsशक्ता देवी सरस्वती । 
यं स्तोतुमसमर्थश्र्च पञ्चवक्त्रः षडाननः ॥ ६ ॥ 
चतुर्मुखो वेदकर्ता यं स्तोतुमक्षमः सदा । 
गणेशो न समर्थश्र्च योगीन्द्राणां गुरोर्गुरुः ॥ ७ ॥ 
ऋषयो देवताश्र्चैव मुनीन्द्रमनुमानवाः । 
स्वप्ने तेषामदृश्यं च त्वामेवं किं स्तुवन्ति ते ॥ ८ ॥ 
श्रुतयः स्तवनेsशक्ताः किं स्तुवन्ति विपश्र्चितः । 
विहायैवं शरीरं च बालो भवितुमर्हसि ॥ ९ ॥ 
वसुदेवकृतं स्तोत्रं त्रिसंध्यं यः पठेन्नरः । 
भक्तिदास्यमवाप्नोति श्रीकृष्णचरणाम्बुजे ॥ १० ॥ 
विशिष्टपुत्रं लभते हरिदासं गुणान्वितम् । 
सङकटं निस्तरेत् तूर्णं शत्रुभीत्या प्रमुच्यते ॥ ११ ॥ ॥ 
इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे श्रीकृष्णजन्मखण्डे वसुदेवकृतं श्रीकृष्णस्तोत्रं संपूर्णम् ॥
वसुदेवकृत श्रीकृष्ण स्तोत्र मराठी अर्थः 
वसुदेव म्हणाले: 
१) हे भगवंता, तुम्ही सहज शोभायमान, इन्द्रियातीत, अविनाशी, निर्गुण, सर्वव्यापी, ध्यानानेसुद्धा कोणालाही वश होणारे नाही, सर्वांचे ईश्र्वर आणि परमात्मा आहात. आपण स्वेच्छामय, सर्वस्वरूप, स्वच्छंद रुपधारी, निर्लिप्त, परब्रह्म तसेच सनातन बीजरुप आहात. 
२) आपण स्थूलाहून अतिस्थूल, सर्व व्याप्त, अति सूक्ष्म, दृष्टिस न दिसणारे, सर्व शरिरांमध्ये वास करणारे, तसेच अदृश्य आहात. साकार, निराकार, सगुण, गुणांचा समुह, प्रकृति, प्रकृतीचे मालक तसेच सर्व पदार्थांत व्याप्त असूनही सर्वापासून अलीप्त आहात. 
३) हे विभो, आपण सर्वेश्र्वर, सर्वरूप, सर्वान्तक, अविनाशी, सर्वाधार, निराधार आणि तर्कापलीकडे आहात. मी आपली काय स्तुति करू? शेषनागसुद्धा आपली स्तुती करण्यास असमर्थ आहेत. देवी सरस्वती सुद्धा आपली स्तुती करण्यास असमर्थ आहे. पंचमुखी श्रीशंकर आणि सहा तोंडे असलेला स्कन्दसुद्धा आपली स्तुती करू शकण्यास असमर्थ आहेत. 
४) वेदांना निर्माण करणारे चार तोंडे असलेले ब्रह्मदेवसुद्धा आपली स्तुती करण्यास असमर्थ झाले. तसेच योग्यांच्या गुरुंचे गुरु गणेश हेही आपली स्तुती करण्यास असमर्थ ठरले; अशा आपली स्तुती ऋषी, देव, मुनीन्द्र, मनु आणि मानव कशी करु शकतील? जेथे श्रुतीसुद्धा आपली स्तुती करण्यास असमर्थ झाल्या तेथे विद्वान लोक काय करु शकणार? आपल्याकडे माझी ऐवढीच प्रार्थना आहे की, आपण या दिव्य शरीराचा त्याग करुन लहान बालकाचे रुप धारण करावे. जो माणूस वसुदेवाने केलेल्या या स्तोत्राचा पाठ त्रिकाळ संध्यासमयी करतो, तो श्रीकृष्णांचा आवडता भक्त होतो, त्याला एका विशिष्ठ श्रीकृष्ण भक्त पुत्राची प्राप्ती होते. त्याची सर्व संकटे नाहिशी होतात आणि त्याचे शत्रु भयातून सुटका होते. 
वसुदेवकृत श्रीकृष्ण स्तोत्र 
Vasudev Krut ShriKrishna Stotra 


Custom Search

Friday, August 3, 2012

ShriJivatichi Aarati श्रीजिवतीची आरती

ShriJivatichi Aarati 
ShriJivatichi Aarati is in Marathi. This Aarati is sung by the ladies in the month of Shravan Month on every Friday. Ladies are asking the Jivati Devi to protect their children. They are asking Jivati Devi to make their children trouble free from Satavi and make the children happy. The ladies who perform this Aarati are asking Jivati Devi to fulfil their desires, let there be happiness in their family always. The ladies describe how they worship Jivati Devi. On the very first day of Shravan month, every year; they bring the photo of Jivati Devi and keep it at their worship place. Then they perform pooja of Jivati Devi on every Friday in the month of Shravan. Garlands of Aaghada, Durva and flowers are offered and placed on the photo. Story of Jivati Devi’s blessings are read. Ladies from nearby places are called for lunch and offered Lunch, Chane, Halad-KumKum and milk is served to them. Puranpoli as a sweet dish is prepared for prasadam and for lunch. Thus the ladies are honoured as Jivati Devi and lunch is offered them by host lady. Finally the ladies are asking Jivati Devi to make their children trouble free from Satavi and make the children happy. 

श्रीजिवतीची आरती 
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । 
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥ 
श्रावण येतांचि आणूं प्रतिमा । 
गृहांत स्थापूनि करुं पूजना । 
आघाडा दूर्वा माळा वाहूं या । 
अक्षता घेऊनि कहाणी सांगू या ॥ १ ॥ 
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । 
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥ 
पुरणपोळीचा नैवेद्द दावू । 
सुवासिनींना भोजन देऊ । 
चणे हळददीकुंकू दूधही देऊं । 
जमुनि आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥ 
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । 
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥ 
सटवीची बाधा होई बाळांना । 
सोडवी तींतून तूंचि तयांना मातां । 
यासाठी तुजला करिती प्रार्थना । 
पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥ 
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । 
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥ 
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे । 
वंशाचा वेल वाढूं दे । 
सेवा हे व्रत नित्य घडूं दे । 
मनीचे हेतू पूर्ण होऊं दे ॥ ४ ॥ 
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । 
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥ 

ShriJivatichi Aarati 
श्रीजिवतीची आरती 


Custom Search

Shri Hanumant Stavan (Cough Nashak Stotra) श्री हनुमन्त स्तवन (कफनाशक स्तोत्र)

Shri Hanumant Stavan (Cough Nashak Stotra) 
This Shri Hanumant Stavan (Cough Nashak Stotra) is in Marathi and it is written by Samarth Ramdas Swami. It is very famous stotra for getting relief from Cough. Many people many times suffer from cough and suffering from bad health. Many children are also suffering from cough. If we recite this stotra loudly every day then we get relief from cough. This stotra is addressed to God Hanuman. Ramdas Swami is asking him to remove the cough, troubling him and causing for bad health. He is telling God Hanuman that there is nobody other than God Hanuman; who can help him from bad health. He is urging God to help him and take the credit of helping people. At the end Samarth Ramdas Swami is saying that because of the blessing of God Hanuman his cough trouble is removed and his health become sound and strong. Hence he is bowing to God Hanuman. Now here in this stotra you can’t find the word God Hanuman but there are other words which indicate that this stotra is addressed to God Hanuman.

श्री हनुमन्त स्तवन (कफनाशक स्तोत्र) 
फणिवर उठवीला, वेग अद्भुत केला । 
त्रिभुवन जन लोकीं, कीर्तिचा घोष केला ॥ 
रघुपति उपकारें, दाटले थोर भारें । 
परम धिर उदारें, रक्षिलें सौख्यकारें ॥ १ ॥ 
सबळ दळ मिळालें, युद्ध ऊदंड झालें । 
कपिकटक निमालें, पाहतां येश गेलें 
परदळ शरधातें, कोटिच्या कोटि प्रेतें । 
अभिनव रणपातें, दुःख बीभीषणातें ॥ २ ॥ 
कपि रिस घनदाटी, जाहली थोर दाटी । 
म्हणवुनि जगजेठी, धावणें चार कोटी ॥ 
मृत विर उठवीलें, मोकळें सिद्ध झालें । 
सकळ जन निवाले, धन्य सामर्थ्य चाले ॥ ३ ॥ 
बहुप्रिय रघुनाथा, मुख्य तूं प्राणदाता । 
उठविं मज अनाथा, दूर सारुनि व्यथा ॥ 
झडकरि भिमराया, तूं करी दृढ काया । 
रघुवीर भजनाया लाग वेगेसि जाया ॥ ४ ॥ 
तुजविण मजलागीं, पाहतां कोण आहे । 
म्हणवुनि मन माझें, तूझिरे वाट पाहे ॥ 
मज तु निरवीले पाहिजे आठवीले । 
सकळिक निजदासा, लागिं सांभाळविलें ॥ ५ ॥ 
उचित हित करावें, उद्धरावें धरावें । 
अनुचित न करावें, त्वां जनीं येश घ्यावें ॥ 
अघटित घडवावे, सेवका सोडवावे । 
हरिभजन घडावें दुःख ते वीघडावे ॥ ६ ॥ 
प्रभुवर विरराया, जाहली वज्र काया । 
परदळ निवटाया दैत्य कूळें कुटाया ॥ 
गिरिवर तुडवाया, रम्य वेशा न ठाया । 
तुजसि अलगडाया ठेविले मुख्य ठाया ॥ ७ ॥ 
बहुत सबळ साठा, मागतो अल्प वाटा । 
न करित हित काटा, थोर होईल ताठा ॥ 
कृपणपण नसावें, भव्य लोकीं दिसावें । 
अनुदिन करुणेचें, चिन्ह पोटीं वसावें ॥ ८ ॥ 
जलधर करुणेचा, अंतरामाजि राहो । 
तरि तुज करुणा हे, कां नये सांग पाहो ॥ 
कठिण ह्रदय झाले, काय कारुण्य केलें । 
न पवसि मज कां रे, म्यां तुझे काय नेलें ॥ ९ ॥ 
वडिलपण करावें, सेवकां सावरावें । 
अनहित न करावें, तूर्त हातीं धरावें ॥ 
निपटचि हठवावें, प्रार्थिला शब्द भेदें । 
कपि घन करुणेचा, वोळला राम तेथें ॥ १० ॥ 
बहुतचि करुणा ही, लोटली देवराया । 
सहजचि कफ गेलें, जाहली दृढ काया ॥ 
परमसुख विलासे, सर्वदा दासानुदासे । 
पवनज अनुतोषे, वंदिला सावकाशें ॥ ११ ॥ 
॥ इति श्रीसमर्थ रामदासकृत कफनाशक श्री हनुमन्त स्तवन संपूर्ण ॥ 

Shri Hanumant Stavan (Cough Nashak Stotra) 
श्री हनुमन्त स्तवन (कफनाशक स्तोत्र)

Custom Search